kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोदी- झेलेन्स्की पुन्हा भेट; रशिया-युक्रेन युद्धावर कोणत्याही स्थितीत वादावर तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान मोदी चिंतित असून, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये झालेली भेट याची साक्ष आहे. या युद्धावर कोणत्याही परिस्थितीत तोडगा शोधण्याच्या प्रयत्नांत मोदी यांची कटिबद्धता यात दिसून येते, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सोमवारी नमूद केले. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनिमित्त मोदी आणि झेलेन्स्की यांची पुन्हा भेट झाली.

स्वत: मोदी यांनीही झेलेन्स्की यांच्या भेटीचा उल्लेख करून युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली तसेच युद्ध थांबवण्याबाबत भारताची कटिबद्धता व या प्रयत्नांना असलेला पाठिंबा पुन्हा एकदा मांडला.

क्वाड परिषदेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांसोबत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने, तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात परस्पर सहकार्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा.जागतिक शांततेच्या दृष्टीने असलेली भूमिका आणि कटिबद्धता सिद्ध करण्यात भारताला यश.

पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धविरामाची घाेषणा करून गाझा भागातून ओलिसांची सुटका करावी, असे आवाहन माेदी यांनी केले. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे वक्तव्य केले. ‘शीख ऑफ अमेरिका’ संघटनेचे जसदीपसिंग जस्सी यांनी शिष्टमंडळासह सोमवारी मोदी यांची भेट घेतली. या समुदायासाठी भारत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी गौरव केला.

अमेरिका-भारत यांच्यातील धाेरणात्मक भागीदारीविषयक संस्था ‘यूएसआयएसपीएफ’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे प्रवासी भारतीयांत उत्साहाचे वातावरण आहे.