kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘मुंज्या’ने दहा दिवसांतच पार केला 50 कोटींचा आकडा

मुंज्या सिनेमाने बॉक्स ऑफिसला अक्षरश: झपाटलं आहे. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला , शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा अवघ्या 30 कोटींमध्ये तयार करण्यात आला. पण या सिनेमाने चार दिवसांतच सिनेमाचं बजेट कव्हर केलं. आता दहा दिवसांतच या सिनेमाने 50 कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे मराठी दिग्दर्शकाचा सध्या बॉक्स ऑफिसवर दबदबा पाहायला मिळतोय.

सॅनसिल्कच्या अहवालानुसार, मुंज्याची 9व्या दिवशीची कमाई ही 45.30 कोटी रुपये इतकी होती. तसेच दहाव्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत या सिनेमाने 6.69 कोटी रुपयांची कमाई केली. ही रात्री 8 पर्यंतची कमाई असल्यामुळे कमाईच्या आकड्यांमध्ये वाढ होऊ शकते. बॉक्स ऑफिसवर मुंज्याही ही घोडदौड पाहता लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या घरात देखील प्रवेश करु शकतो असंही म्हटलं जातंय.

या चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीन्समध्ये वरुण धवन आणि अभिषेक बॅनर्जी दिसले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कथा आता इतर चित्रपटाच्या कथेशी कनेक्ट असू शकते. त्यामुळे आता भेडिया अथवा ‘मुंज्या’ चित्रपटाचा पुढे कोणता भाग आला तर तो चित्रपट समजण्यास अडचण येऊ नये यासाठी देखील अनेकजण ‘मुंज्या’ पाहण्यास जात आहे. ”मुंज्या” हा ‘भेडिया’ युनिव्हर्सचा एक भाग असल्याच्या चर्चेचा फायदा मिळत आहे.

एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक आदित्य यांनी म्हटलं की, मुंज्या ही ब्रह्मराक्षसाची कथा आहे, ज्या कोकणात, महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत. पण अशा गोष्टींवर सिनेमा का बनत नाही, हा प्रश्न मला लहानपणापासूनच पडायचा. अशा गोष्टींवर आधारित कांतारा सिनेमा खूप गाजला होता. त्यामुळे मला असं वाटतं की, आपल्या महाराष्ट्रात आणि देशातील प्रत्येक प्रांतात अशा अनेक कथा आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जर सिनेमे तयार झाले तर विषयांची कमरता आपल्याला भासणार नाही. हॉलिवूडमध्ये तर 50-60 वर्षांत लिहिलेल्या पुस्तकांवर सिनेमे आणि मोठ्या मालिका तयार करण्यात आल्या आहेत. गेम ऑफ थ्रोन्स, हॅरी पॉटर यांसारख्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे शतकानुशतके टिकून राहणाऱ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, म्हणून चित्रपटांच्या कथेसाठी कमरता कधीही भासणार नाही.