kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

इंडियन आयडलमधील स्पर्धकाला नाना पाटेकरांनी अंकशास्त्रावरुन विचारले प्रश्न, परीक्षकही झाले चकीत , व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर नुकतेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल १५ मध्ये पाहुणे म्हणून आले होते. ते त्यांचा आगामी सिनेमा वनवासच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचले होते. दरम्यान, नाना पाटेकर यांनी इंडियन आयडॉलमधील एका स्पर्धकाला विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा प्रश्न ऐकून शोचे परीक्षक देखील चकीत झाले आहेत.

सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनने शनिवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इंडियन आयडॉलचा एक नवीन प्रोमो शेअर केला. यात नाना पाटेकर हे स्पर्धक मिस्केम्मे बोसूसोबत गप्पा मारताना दिसला. नाना पाटेकर यांनी मायस्केमला विचारले, “तुमचा अंकशास्त्रावर विश्वास आहे का?” त्यावर मायस्केमने हो असे उत्तर दिले. त्यानंतर नानांनी तिला स्पर्धा कोण जिंकणार असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून मिस्केमे आवाक होते. त्यानंतर नानांनी तिला माझे वय किती असा प्रश्न विचारला आहे. यावेळी मिस्के शोचा होस्ट, गायक आदित्य नारायण याच्याकडे बघताना दिसत आहे.

व्हिडीओच्या शेवटी नाना बोलताना दिसत आहेत की, ‘बघ, झं अंकशास्त्र हे सगळं बकवास आहे. तू फक्त न डगमगता गात रहा. हेच सत्य आहे. बाकी सोडा.’ नानांचा सरळपणा पाहून बादशहाही घाबरलेला दिसत होता. सोनी वाहिनीने हा व्हिडीओ शेअर करत, ‘बेबाक नाना बोल उठे – अगर गाने पे फुल फोकस है, तो बाकी कुछ जरुरी नहीं’ असे कॅप्शन दिले आहे.

नाना पाटेकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने, ‘बिचारी… नानांनी विचारलेल्या प्रश्नामुळे टेन्शनमध्ये आली’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने, ‘हा काही सखोल विचार होता’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘इंडियन आयडॉलमध्ये जरा जास्तच रोस्टिंग होत नाहीये का?’ असे म्हटले आहे.

या सीझनमध्ये आदित्य नारायण होस्ट म्हणून परतला होता. श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह या शोचे परीक्षक आहेत. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर रात्री ९ वाजता इंडियन आयडॉल १५ प्रसारित होतो. या शोचा पहिला सिझन २००४ साली प्रदर्शित झाला होता. अभिजीत सावंतने पहिल्या सिझनची ट्रॉफी जिंकली होती.