लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधाननं अवघी मराठी सिनेइंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत शोक व्यक्त केला. अनेक राजकीय नेत्यांनाही अतुल यांना श्रद्धांजली वाहिली. आता देशाचे पंतप्रधान यांनीही अतुल परचुरे यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहित अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांचं सांत्वन केलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून आलेलं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय.
काय लिहिलंय पत्रात?
अतुल परचुरे यांच्या निधनाबद्दल कळालं, प्रचंड दु:ख झालं. त्यांच्या निधनानं कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचं मराठी तसंच हिंदी सिनेइंडस्ट्रीतलं योगदान विसरणं अशक्य आहे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी परचुरेंच्या कामाचं कौतुक केलं.
तसंच अतुल याचं काम आणि त्यांचे विचार त्यांच्या कुटुंबाला तसंच चाहत्यांना प्रेरणा देत राहिलं. या कठीण काळात त्यांच्या आठवणीच कुटुंबासाठी आधार आहेत. कुटुंबियांना, चाहत्यांना अतुल यांची उणीव भासत राहणार आहे. या कठीण काळात कुटुंबियांना देव शक्ती देवो, असं म्हणत मोदींची कुटुंबियाचं सांत्वन केलं आहे.