मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन बॉम्बे सेंटर या ठिकाणी काल करण्यात आले. रेल्वे लगत राहत असलेल्या गरीब कुटुंबांवर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत असून, त्यांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था न करता बेघर केले जात आहे.
अन्यायाविरोधातील लढा रेल्वे प्रशासनाच्या या क्रूर कारवाईमुळे गरीब कुटुंबं बेघर होऊन अत्यंत हालअपेष्टांना सामोरी जात आहेत. या अन्यायाविरोधात त्रस्त नागरिकांनी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्यांनी आवाज उठवत प्रशासनाला जाब विचारला.
आंदोलनाची प्रगती:
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगराचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे प्रशासनाने त्रस्त नागरिकांच्या अडचणींची दखल घेत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत उपस्थित प्रमुख नेते आणि पदाधिकारी
ॲड.अमोल मातेले: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष
सचिन लोंढे: युवक जिल्हाध्यक्ष
अमीरभाई शेख: जिल्हा उपाध्यक्ष
ब्लेस डिसोजा: तालुका अध्यक्ष
सरिफा शेख, अश्विनी बनसोडे, गणेश शिंदे, रामेश्वर मस्के, समीर शिंदे, सुनील डकरे यासह त्रस्त नागरिक उपस्थित होते.
- आंदोलनातील मागण्या रेल्वे प्रशासनाने गरीब कुटुंबांना पूर्वसूचना व पर्यायी व्यवस्था न करता बेघर करण्याचे प्रकार थांबवावेत. बेघर झालेल्या कुटुंबांसाठी त्वरित योग्य पुनर्वसनाची व्यवस्था करावी.
भविष्यात गरीब कुटुंबांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने हमी द्यावी. गरीबांच्या हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहील!
राष्ट्रवादी युवक काँग्रेस गरिबांच्या हक्कांसाठी नेहमीच लढा देत राहील. प्रशासनाने वेळेत योग्य पावलं उचलली नाही, तर आणखी मोठे आंदोलन उभे केले जाईल.