kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मंगळवारी सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील हेल्पलाइनवर अज्ञात व्यक्तीने सलमानला जिवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी केली. वेगवेगळे संदेश धाडून त्याने ही मागणी केली.

वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रकाश सुतार, सचिन पालवे आणि अंमलदार मुजावर, चव्हाण आणि बोडके यांनी आरोपीचा मोबाइल क्रमांकाचे सीडीआर लोकेशनद्वारे शोध सुरू केला. तो वांद्रे परिसरात असल्याचे समोर येताच तेथून मुस्तफाला अटक करणयात आली. बुधवारी त्याला न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

संदेशात काय?
 ये एक मजाक नही है, बाबा सिद्दीकी को कैसे खतम किया. अगला निशाना झिशान है. त्यानंतर सलमान खान को भी गोली मारेंगे.
 ३१ ऑक्टोबरको पता चलेगा, दो करोड रुपये देने को बोलो, असे त्यात म्हटले होते.