अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे दोघेही ८ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीचे पालक झाले. आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांना आपल्या लेकीची झलक दाखवली आहे. त्यांनी सोशल मीडियावर मुलीचा फोटो शेअर केला आहे आणि तिचे नावही सगळ्यांना सांगितले आहे.
या फोटोमध्ये या जोडप्याच्या मुलीचा चेहरा दिसत नसला, तरी तिचे छोटे पाय खूपच गोंडस दिसत आहेत. फोटोमध्ये या त्यांची मुलगी आई दीपिकाच्या मांडीवर दिसत आहे. या दोघींनीही लाल रंगाचा सूट परिधान केला आहे. रणवीर-दीपिकाने त्यांच्या मुलीचे नाव ‘दुआ पादुकोण सिंह’ ठेवले आहे. फोटो शेअर करताना जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दुआ पादुकोण सिंह, ‘दुआ’: म्हणजे प्रार्थना… कारण ती आमच्या प्रार्थनांचे उत्तर आहे. आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. दीपिका आणि रणवीर’
दीपिका पादुकोणच्या या पोस्टवर तिचे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या पोस्टला काही तासांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत. यूजर्ससोबतच सेलेब्सही या फोटोवर कमेंट करत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टनेही यावर कमेंट केली आहे आणि अनेक रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.