सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्माविषयी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय सेवा सेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभव पंथाच्या एका कार्यक्रमात संवाद साधला. थोड्याशा ज्ञानाने फुगलेला माणसाला ब्रह्मदेवसुद्धा समजवू शकत नाही, कारण धर्म हे जिगरीच काम आहे, असे सरसंघचालक म्हणाले. धर्म समजावा लागतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले. धर्म हा समजवावा लागतो धर्म नीट समजला नाही तर धर्माच्या नावाने अधर्म होते असं महत्त्वाचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. म्हणून धर्म समजावण्याचे काम करणारे संप्रदाय असावे लागतात असेही मोहन भागवत म्हणाले.
काही दिवसांपुर्वी नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना लोकसंख्या दराबाबत चिंता व्यक्त केली होती. लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको, असे लोकसंख्या शास्त्र सांगते. हा चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले.लोकसंख्या शास्त्र सांगते लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको असे लोकसंख्या शास्त्र सांगते. आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे म्हणजे कमीत कमी तीन असावेत, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष 1998- 2002 च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असेच सांगितले आहे की, ‘लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये’. असा उल्लेख करत भागवत म्हणाले की, आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. मग जर 2.1 एवढे लोकसंख्या वाढीचे दर पाहिजे, तर अपत्य दोन पेक्षा जास्त पाहिजे. मग तीन पाहिजे कमीत कमी असं भागवत म्हणाले.