kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दुःखद बातमी ! हरहुन्नरी कलाकार हरपला ; ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे ते कर्करोगाशी झुंजत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना आता व्यक्त केली जातेय. त्यांच्या पार्थिवावर आज उशिरा अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी – ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. गेले दीड वर्ष ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनीराहत्या घरे अखेरचा श्वास घेतला.

विजय कदम यांनी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केलं. त्यांचं ‘विच्छा माझी पुरी कर हे लोकनाट्य आणि ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम त्यांचा कार्यक्रम खूप गाजले. यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’व ‘आम्ही दोघ राजा राणी’ हे चित्रपट खूप नावाजले.आता त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.