नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन जोरदार तयारीला लागलेले आहे. त्यातच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नामकरणावरून सध्या साधू महंतांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी थेट ‘कुंभमेळा मंत्री’ या नव्या पदालाच विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच संपूर्ण कारभार हाती घ्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसा यांच्या भूमिकेकडे आता सगळ्याचं लक्ष लागले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजला नुकताच महाकुंभमेळा साजरा झाला. जगभरातून आलेल्या साठ कोटीहून अधिक भाविकांमुळे या सोहळ्याला जागतिक महत्व प्राप्त झाले होते.दरम्यान प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होऊ घातलेल्या कुंभमेळ्याचे नियोजन करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच यामध्ये लक्ष घातलं असून नुकताच त्यांचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा देखील दौरा पार पडला आहे.
साधू महंत आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत सर्व कामे वेगाने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे कुंभमेळा यशस्वी पार पाडावा या याकरिता भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे ‘कुंभमेळा मंत्री’ हे विशेष खातेही देण्यात आले आहे. मात्र, हे पद साधू महंतांना मान्य नाही. उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनीच संपूर्ण कुंभचा कारभार पाहावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Leave a Reply