kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा शिवसेना संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब व खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या हस्ते गौरव…

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे व खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त तसेच भगवा सप्ताह औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात आरोग्य अधिकारी, कर्मचारी व आरोग्य सेविकांचा शनिवार ता.१० सन्मान करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या सप्ताहाचे औचित्य साधून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख डॉ रेणुका पतंगे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हिंगोली व नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात थोरात साहेब, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख डॉ रेणुका पतंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय सावंत, उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे , वसीम देशमुख शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष, डॉ गंगाधर काळे वैद्यकीय अधीक्षक ,‌ डॉ कुलदिपके यासह मीरा पांचाळ महीला उपजिल्हाप्रमुख , संगीता स्वामी महिला शहरप्रमुख , वैष्णवी कड, माधव सदगर , श्याम आखरे, प्रमोद मोरे व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब व संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यानंतर महिला रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविका, आशा वर्कर यांचा छत्री व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.‌ खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी डॉ गजानन पतंगे व शिवसेना महिला जिल्हा प्रमुख डॉ रेणुका पतंगे या दाम्पत्याचे अभिनंदन करीत त्यांनी अहोरात्र रुग्णांची सेवा करणारांसाठी स्त्यूत्य उपक्रम राबविल्याचे प्रशंसा करीत सांगितले. प्रस्ताविक डॉ मसारे यांनी केले.‌सुत्रसंचलन रामू चव्हाण यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवसेना, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.