शिवसेना (उ बा ठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार चिखली तालुका शिवसेना (उ बा ठा) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, संजय राठोड विधानसभा संपर्क प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सिंधी मंगल कार्यालय चिखली जिल्हा बुलडाणा येथे संपन्न झाली.

आगामी काळातील पक्षाची रणनीती, पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ प्रमुखांचे कार्य, बि एल ए यांच्या नियुक्त्या या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला लोणार तालुक्यातील शिवसेनेचे (उ बा ठा) शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपीठावर म आ जिल्हा संघटिका जिजाताई राठोड, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे, प्रा सदानंद माळी, उप जिल्हा प्रमुख कपिल खेडेकर, सुनील घाटे, तालुका प्रमुख किसन धोंडगे, लखन गाडेकर, की से जि. प्र.वसंतराव झाल्टे, विधानसभा संघटक अरुण खडके, की से तालुका प्रमुख नारायण वाणी, तालुका संघटक विष्णू मुरकुटे, शहर प्रमुख श्रीराम झोरे, सौ कमलताई धनवे, उप तालुका प्रमुख तथा संचालक संतोष वाकडे, विश्वासराव खंडागळे, गजानन पवार, अशोक सुरडकर, प्रवीण मरकड, प्रीतम गैची, आनंद गैची, प्रदिप वाघ यांची उपस्थिती होती.