kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चुकीची माहिती शेअर केल्याची तक्रार ; जाणून घ्या काय आहे प्रकार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अप्रचाराबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील ‘फशिव सेना’ ह्या पेजवरून पक्षातील नेत्यांचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून माहिती शेअर केल्याची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन, लेखी स्वरूपात केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून अप्रचाराबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील ‘फशिव सेना’ ह्या पेजवरून पक्षातील नेत्यांचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून माहिती शेअर केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील ‘फशिव सेना’ ह्या पेजवरून पक्षातील नेत्यांचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती शेअर केली जातेय. ह्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन, लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.

महाराष्ट्रात इव्हीएमच्या माध्यमातून प्रचंड बहुमताची सत्ता मिळवली, तरी सत्ताधाऱ्यांच्या कुरघोड्या कमी होत नाहीयत. जनहित साधायचं सोडून, सोशल मीडियाद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अपप्रचार, पक्षाच्या विचारसरणीला वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील ‘फशिव सेना’ ह्या पेजवरून पक्षातील नेत्यांचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती शेअर केली जातेय. ह्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव साईनाथ दुर्गे ह्यांनी सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन, लेखी स्वरूपात तक्रार केली.

अशी बदनामीकारक, चुकीची माहिती पसरविणाऱ्या ह्या सोशल मिडिया पेजवर बंदी घालून, पेज चालविणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ह्या तक्रारीत केली.