kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

स्काय गोल्डचे पुण्यातील दुसरे शोरूम पिंपरीमध्ये सुरू ; सुप्रसिध्द अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते उद्घाटन संपन्न

स्काय गोल्ड या इंटरनॅशनल ब्रॅंडच्या वतीने त्यांचे आंतरराष्ट्रीय 7 वे आणि पुण्यातील दुसरे शोरूम आज कोहिनूर टॉवर,पिंपरी येथे सुरू करण्यात आले. पारंपारिक मराठमोळ्या दागिन्यांसह वैविध्यपूर्ण रेंज असलेल्या या भव्य शोरूमचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या विस्ताराबद्दल आणि पिंपरीतील शोरूम बद्दल अधिक माहिती देताना स्काय गोल्ड चे एमडी अरविंद माळी म्हणाले, आमचे हे 7 वे शोरूम आहे, यापूर्वी आम्ही शारजा, दुबईसह केरळ मध्ये शाखा सुरू केलेल्या आहेत. पुण्यात हडपसर येथे महाराष्ट्रातील पहिले शोरूम सुरू झालेले आहे आज पुण्यातील दुसरे शोरूम कोहिनूर टॉवर,पिंपरी येथे ग्राहकांच्या सेवेत कार्यान्वित होत आहे. हे भव्य शोरूम दीड हजारांहून अधिक स्क्वेअर फुट मध्ये बसलेले आहे. आमच्याकडे सोन्यासह डायमंडचे कलेक्शन अतिशय सुंदर आहे, लाइटवेट दागिन्यांतही आमच्याकडे भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. वैविध्यपूर्ण, नावीन्यपूर्ण डिझाईन देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे.

स्काय गोल्डचे रफीक पाराईल म्हणाले, आमच्याकडे शोरूम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर झीरो पर्सेंट मेकिंग चार्जेस ऑफर आहे, याशिवाय विविध खरेदीवर गोल्ड आणि सिल्वर कॉइन भेट देण्यात येणार आहे. याशिवाय उद्घाटनानिमित्त दोन प्रकारचे लकी ड्रॉ ठेवण्यात आले आहेत त्यापैकी एका मध्ये तर आमच्याकडे खरेदी करण्याचे सुद्धा बंधन नाही, आमच्या शोरूम ला भेट देणारे त्यात सहभागी होऊ शकतात. ग्राहकहिताला प्राधान्य देत आम्ही आमचा विस्तार करत आहोत.