महायुतीने जाहीर केलेल्या संकल्पावर !राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी टीका केली आहे. महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा स्वप्न विकणारा, पण जमिनीवर कोणताही आधार नसलेला आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन जनतेला फसवणाऱ्या सरकारने आता अर्थसंकल्पाच्या नावाने लोकांची दिशाभूल केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे “नुसताच तोंडाचा पट्टा आणि काम शून्य” आहे. असे ते म्हणाले आहेत. आणखी काय म्हणाले आहेत अमोल मातेले जाणून घेऊया …
आणखी काय म्हणाले ॲड. अमोल मातेले ?
शेतकऱ्यांसाठी मोठी थाप!कर्जमाफीचा फसवा ढोल निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ म्हणणारे आता गप्प का?”हातातोंडाशी आलेला घास हिसकावला” अशी शेतकऱ्यांची अवस्था!
हमीभाव आणि खरेदीबाबत सरकार गप्प!सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. हमीभाव वाढणार की नाही?सरकारी खरेदीची ग्वाही नव्हे, तर फक्त “भुलथापा!”
पीक विमा योजनांचा पोरखेळ शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळेल की नाही? की विमा कंपन्यांना फक्त फायदा?”नाव मोठे आणि लक्षण खोटे!”
महिलांना दिलेली आश्वासने गटारात! “लाडकी बहिण” योजना फसवी! २१०० रुपये देण्याच्या घोषणेचा आता गजरा गायब!फक्त अटी वाढवल्या, पैसे मात्र हवेत विरले! महिलांच्या सुरक्षेचे काय?
अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, पण सरकारला गप्प बसायला वेळ आहे!
“सिंहासन मिळालं की जनतेला विसरायचं” हेच धोरण! असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केला.
तरुणाईसाठी नोकऱ्या नाहीत, फक्त फसवणूक!रोजगार निर्मितीचा बट्ट्याबोळ लाखो युवकांना नोकरभरतीचं गाजर दाखवलं, पण आता ती भरतीच नाही.”हात दाखवून अवलक्षण” करणाऱ्या सरकारला जनतेने जागा दाखवायची वेळ आली!शिक्षणावर खर्च नाही, जाहिरातींवर कोटी!विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती नाही, पण जाहिरातींवर अब्जावधींचा खर्च!
“डोंगर पोखरला आणि उंदीर निघाला!”
महाराष्ट्रात उद्योग येत नाहीत, उलट गुजरातला जातायत!सरकार कधी महाराष्ट्राच्या विकासासाठी लढणार?
“गुंतवणूकदारांचे पाठ फिरवणारे सरकार म्हणजे राज्याचा घात!”
आरोग्य आणि मूलभूत सुविधांमध्ये सरकारचा बेबंद कारभार! ग्रामीण आरोग्य केंद्रं ओसाड, औषधं नाहीत!
सरकारी हॉस्पिटल्समध्ये औषधं नाहीत, पण मंत्र्यांसाठी खासगी इस्पितळं तयार!
“गरिबांच्या नशिबी भोपळाच!”
पाणी, वीज, रस्ते यांची वाट लागली!
“एकविसाव्या शतकात महाराष्ट्र असूनही लोकांना प्यायला पाणी नाही – हे कोणत्या मुख्यमंत्र्याचे यश आहे?”
विकासाच्या नावाखाली केवळ जाहिराती आणि खोटी स्वप्नं दाखवली जातायत!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष यांनी असे म्हटले महायुती सरकार म्हणजे “शब्द मोठे, पण कृती शून्य!”राज्य चालवायला पैसा नाही, पण आश्वासने मात्र ढिगानं देतात!
कष्टकरी जनतेला हक्काचं दान नाही, पण नेत्यांच्या फायद्यासाठी भरमसाट निधी! “गरिबांना थापा आणि श्रीमंतांना लाभ” हे धोरण आता पुरे!”जनतेच्या घशात खडा आणि बड्या उद्योजकांच्या तिजोरीत मोती” हे धोरण महाराष्ट्र सहन करणार नाही!
हा अर्थसंकल्प म्हणजे महायुती सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा! आता वेळ आली आहे, सरकारला जबाबदारीला लावण्याची!