Breaking News

‘धनंजय मुंडेच्या घरीच बैठक झाली पण माझ्या मनात एक भीती…’ सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे. यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. झी 24 तासचा विशेष कार्यक्रम ‘टू द पॉइंट’ मध्ये सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांची धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप केला. काय म्हणाले सुरेश धस? जाणून घेऊया.

14 जून रोजी सुनिल,शुक्ला नावाचा अधिकारी, काळकुटे आणि वाल्मिक कराड यांची धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते. एसआयटी तपासात ही माहिती उघड होईलच. धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. वाल्मिक कराड आका आहे. 302 मध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचे सुरेश धस म्हणाले. सातपुडा बंगल्यावर बैठक झाली हे मी आत्मविश्वासाने सांगतो. यांचे सीडीआर तपासा. मला फक्त एकच भीती आहे की, आयफोन ते आयफोन बोलणं झाल तर कंपनी डेटा देत नाही. दुर्देवाने तसे होऊ नये. पण या मुलांनी व्हिडीओ कॉल दाखवला. त्यात आयफोन नसावा. हत्या केल्यानंतर त्यांनी धनंजय मुंडेंना कॉल केला असावा, असा आरोप सुरेश धस यांनी केला.

वाल्मिक कराड यांचे अनेक फार्महाऊस आहेत. त्यांना ईडीची नोटीस आधीच गेलेली आहे. एका दिवसाला 2,3, 5 कोटी जमा झालेच पाहिजेत. दुसऱ्या पत्नीच्या नावे कुठे कुठे संपत्ती आहे. ही माहिती समोर येईल. धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा की त्यांना बिन खात्याचे मंत्री करायचे हा अधिकार अजित पवारांचा आहे. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. माझा राजकीय अनुभव सांगतो की त्यांच्याकडे ग्राऊंड रिअॅलिटी जात नाही. त्यांच्या जवळचे लोक धनंजय मुंडेंना संभाळून घेतायत, असेही सुरेश धस म्हणाले.

संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांला 10 ते 15 गांवामधून फिरवण्यात आले. तब्बल 4 तास संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी वाल्मिक कराड यांच्यासह बैठक झाली. ज्या कंपनीच्या खंडणीसाठी संतोष देशमुख यांचा खून झाला त्यासाठीची बैठक ही धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी झाली असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला. 100 टक्के ‘ही’ माहिती ठरी ठरणार SIT तपासात सर्व उघडकीस येईल असा देखील सुरेश धस यांचा दावा आहे. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती आणि नंतर निवडणुकीसाठी या कंपनीकडून 50 लाख रुपये घेण्यात आले, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. वाल्मिक कराडला ED ची नोटीस गेलेली आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावार देखील मोठी मालमत्ता जमा आहे. धनंजय मुंडे यांचा राजीना घेण्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार अजित पवार यांना आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्याजवळील लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्वल निकम यांना लवकराच लवकर नियुक्ती पत्र मिळवून देणे यासाठी माझे सर्व प्रयत्न सुरु आहेत. न्यायालयाकडून देखील याची गांभिर्याने देखल घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *