शिवसेना – युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिंडोशी विधानसभा पुरस्कृत गोकुळवन मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजित २५ रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त भव्य कबड्डी स्पर्धा (जिल्हास्तरीय) तसेच आमदार चषक भव्य उद्घाटन पक्षाचे सचिव व होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून घरा घरात पोहचलेले आदेश बांदेकर यांनी केले.
कब्बडी चा जन्म 1966 साली गिरणगावात झाला हा खेळ खऱ्या अर्थाने तेथे रुळला असे सांगत कार्यक्रमाचे उदघाटक शिवसेनेचे सचिव व अभिनेते आदेश बांदेकर यांनी आपल्या भाषणात सांगत परळ लालबाग येथील जुन्या गोष्टींना ते देत पुढे म्हणाले की कब्बडी हा खेळ आता मर्यादीत राहिला नसून पूर्व उपनगरात पोहचला आहे.
नागरी निवारा येथील मैदानात तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात एकूण 32 संघ सहभागी झाले आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमदार सुनील प्रभू यांनी आदेश बांदेकर यांचा सत्कार केला या कार्यक्रमास जोगेश्वरीचे शिवसेना आमदार बाळा नरं उप नेते अमोल कीर्तिकर उप विभाग प्रमुख भाई परब माजी उप महापौर सुहास वाडकर माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे वार्ड क्र 40 व 41 चे शाखा प्रमुख संपत मोरे व संदीप जाधव युवा सेना कार्यकांरीणी सदस्य अंकित प्रभू विभाग संघटक प्रशांत कदम व पदाधिकारी उपस्थित होते तसेच गोकुळवन मित्र मंडळातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply