पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृनमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी ‘पोयला बैसाखी’च्या मुहूर्तावर मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, कायदा हातात घेण्याऱ्यांची गय केली जाणार नाही. कुठल्याही लोकशाहीवादी समाजाचा पाया, हा लोकांचा आवाज आणि त्यांची मते ऐकून घेण्याच्या अधिकारावर अवलंबून असतो. लोकशाही पद्धतीने शांततापूर्वक निदर्शन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र, मात्र कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सर्वांना शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही. कायदा हातात घेऊ नका. जर कोणी तुम्हाला चिथावणी देत असेल तर शांतता राखा. जो चिथावणीला बळी पडत नाही, तोच खरा विजेता असतो. धर्म सर्वात मोठा नाही, मानवता सर्वात मोठी आहे. जर तुम्ही लोकांवर प्रेम करत असाल तर तुम्ही सर्वांना जिंकू शकता. पण, जर तुम्ही स्वतःला वेगळे केले तर तुम्ही कुणालाही जिंकू शकत नाही. राज्य सरकार सर्वांसोबत उभे आहे, मग तो कुणीही पीडित असो.”
कालीघाट मंदिर परिसरातील स्कायवॉकसंदर्भात बोलताना ममता म्हणाल्या, “या प्रोजेक्टचा 99 टक्के खर्च सरकारने केला. तर केवळ मंदिरावर जो सोन्याचा कळस आहे, तो रिलायन्सने तयार केला आहे. तोही त्यांच्या इच्छेने, मी केवळ त्यांना यासाठी परवानगी दिली.”
Leave a Reply