राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचे रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहेत. विरोधकांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असं असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसने केली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्या प्रकरणी गुन्हे दाखल होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली. शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्र लिहित निवडणूक आयोगाला केली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.