kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

उर्फी जावेदचं इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड; नेटकरी म्हणाले…

अभिनेत्री उर्फी जावेदचं इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं आहे. अभिनेत्रीने स्वत: स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फीचं इंस्टाग्राम सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उर्फीने सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. उर्फीने आता तिचं अकाऊंट रिकवर केलं आहे. तिने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवर मेटाने दिलेली माहिती दिसत आहे. कम्यूनिटी गाइडलाइन्सचं पालन न केल्याने इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झाल्याचं यात म्हटलं आहे.

उर्फीने स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे,”आज अनेकांची इच्छा पूर्ण झाली”. दरम्यान, उर्फी जावेदच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिलं आहे,”ही गंभीर बाब आहे”. एका क्रिएटरसाठी सोशल मीडिया अकाऊंट खूप महत्त्वाचं असतं. या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. खूप चांगला निर्णय, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात”. तर काहींनी मात्र ‘मिस यू उर्फी’ अशा कमेंट्स केल्या आहेत.