Breaking News

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट ; नेमकी काय झाली चर्चा ?

नुकतीच, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झाली.

कोणते आहेत मुद्दे ?

१. सर्वांसाठी पाणीः

माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आणलेल्या धोरणानुसार, मुंबईतील प्रत्येक व्यक्तीला पाणी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. मात्र ह्याआधीच्या मिधें सरकारने ह्यावर आणलेली स्थगिती त्वरीत उठवावी. जेणेकरुन सर्व मुंबईकरांना ह्याचा लाभ मिळेल.

२. पोलीस वसाहतीः

  • निवृत्त पोलीस कुटुंबांना पोलीस वसाहतींमध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या दंड कमी करावे.
  • निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईत कायमस्वरुपी घरे उपलब्ध उपलब्ध करुन द्यावीत.
  • महाविकास आघाडी सरकारने नवीन पोलीस वसाहतींसाठी ₹६०० कोटींची तरतूद केली होती. वरळी, माहिम, नायगाव, कुर्ला येथील पोलीस वसाहतींचे प्रस्ताव मागील २ वर्षांपासून प्रलंबित आहेत, ते पुन्हा सुरु करावेत.

३. कलेक्टर जमीन फ्री होल्ड करण्यासाठी प्रीमियम कमी करणे.


कलेक्टर जमिनीच फ्री होल्ड रुपांतरण करण्यासाठी प्रीमियम कमी करण्याचे धोरण लवकरात लवकर लागू करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *