पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेसाठी 73 गटांमध्ये जवळपास 299 उमेदवार मैदानात होते. तर 13 पंचायत समित्यांच्या 146 गणांसाठी सुमारे 528 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. त्यामुळे पुण्यात नेमकी कोणाची सत्ता येणार, कोणता पक्ष आघाडी घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
निकालाच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने थेट बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादीने तब्बल 39 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला असून 37 चा बहुमताचा आकडा त्यांनी सहज पार केला. ग्रामीण भागात केलेलं संघटन, स्थानिक प्रश्नांवर लक्ष आणि मजबूत उमेदवारांची निवड, या सगळ्याचा फायदा राष्ट्रवादीला झाल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या, पण शेवटी राष्ट्रवादीने निर्णायक आघाडी घेतली.
या निकालामुळे पुणे जिल्हा परिषदेत आता राष्ट्रवादीचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. पुढील काळात जिल्ह्याच्या विकासकामांची दिशा काय असेल, नवनिर्वाचित प्रतिनिधी कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देतील, याकडे आता पुणेकरांचं लक्ष लागलेलं आहे.
राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा केला पार
एकुण जागा – 73 पैकी 67 जागांचा निकाल – बहुमताचा आकडा – 37
भाजप- 9
शिवसेना- 4
राष्ट्रवादी- 47
शरद पवार गट - 1
ठाकरे गट- 6
काँग्रेस- 0
अपक्ष - 0
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल 2017
पुणे- ( 75 जागा )
भाजप-- 07
शिवसेना--13
कॉग्रेस-- 07
राष्ट्रवादी-- 44
इतर-- 04
पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता
एकुण जागा – 73 पैकी 55 जागांचा निकाल
भाजप- 7
शिवसेना- 4
राष्ट्रवादी- 40
शरद पवार गट - 1
ठाकरे गट- 3
काँग्रेस- 0
अपक्ष - 0
बहुमत 37 चा आकडा केला पार











