जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांचे निधन झाले आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
काल, संध्याकाळी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. उद्या सकाळी ११ वाजता वाजल्यापासून लोअर परळला त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी आईच्या निधनाची बातमी दिली आहे. माझी आई आशा भोसले यांचं निधन झालं आहे. उद्या चार वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव राहत्या घरी ठेवणार आहे असे आनंद भोसले यांनी म्हटले आहे.
१९३३ मध्ये जन्मलेल्या आशा भोसले यांनी सुमारे आठ दशकांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला ठसा उमटवला. ‘दम मारो दम’, ‘रमैया वस्तावैया’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘ये मेरे वतन के लोगो’ (बॅकग्राउंड), ‘क्या करें’ सारख्या अनेक सुपरहिट गाण्यांनी त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनात स्थान मिळवले होते. आशा भोसले यांना ‘आशा ताई’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या खास आवाजातील ऊर्जा, विविधता आणि भावपूर्ण गायकीमुळे त्यांना ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ आणि ‘Queen of Indipop’ अशा उपाधी मिळाल्या होत्या.













Leave a Reply