बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नाने विधानसभा अंतर्गत असलेल्या बुलढाणा व मोताळा तालुक्यातील तब्बल 47 गावांचा डोंगरी भागात समावेश करण्यात आला आहे. सदर निर्णय डोंगरी विकास विभाग कार्यक्रमांतर्गत सुधारित निकष नुसार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच बुलढाणा विधान मतदार संघाला विकासासाठी विशेष व प्रचंड निधी उपलब्ध होणार असल्याने  मतदार संघात विकासाची गंगा पहावयास मिळणार आहे.

बुलढाणा विधानसभा मतदार संघात आमदार संजय गायकवाड यांनी विकासाचा झंझावात उभा केला आहे. शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झपाट्याने विकास होत आहे. असे असताना मोताळा व बुलढाणा तालुक्यातील अनेक गावात सुविधा नसल्याने या परिसराचा विकास रखडला होता. सदर गावांचा विकास व्हावा यासाठी यांचा  डोंगरी भागात समावेश करण्यात यावा यासाठी आ. संजय गायकवाड हे मागील अनेक दिवसापासून प्रयत्नशील होते. शासनाच्या डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत नुकतेच सुधारित निकष जाहीर करण्यात आले आहे. या सुधारित निकष च्या अनुषंगाने बुलढाणा तालुक्यातील 16 तालुक्यांचा तर मोताळा तालुक्यातील 31 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

आता शासनाच्यावतीने या गावांच्याविकासासाठी विशेष निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सदर निधीच्या माध्यमातून परिसरात प्राथमिक शिक्षण, पाटबंधारेची कामे, रस्ते विकासाची कामे, पाणी पुरवठ्याची कामे, समाज मंदिर, सामाजिक सभागृह, उपसा सिंचन योजना, एसटी निवारा, अंगणवाडी इमारत बांधकाम अंतर्गत अंगणवाडी इमारत दुरुस्ती, अंगणवाडी इमारत,  संरक्षण भिंत, नाविन्यपूर्ण वर्ग खोल्या बनविणे, शैक्षणिक साहित्य, सौरऊर्जेवरील दिवे, विद्युत विकास कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत.

या गावांचा करण्यात आला समावेश :

बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, अटकळ, मढ, भडगाव, पाडळी, पळसखेड नाईक, बोरखेड, जनुना, भादोला,  देव्हारी, तारापूर, ढालसावंगी, महोळ,जामठी, बिरसिंगपूर, पिंपरखेड, शेकापूर, गिरडा, सावळा, बुलढाणा ग्रामीण, जांभरुण, बोरखेड, हनवतखेड, पलढग तर मोताळा तालुक्यातील गिरोली,  इसालवाडी,चिंचखेडनाथ, चिंचखेड हरमोद, पिंपळगाव नाथ, उबाळखेड, राहेरा, रामगाव, कोथळी,चिंचखेड नाथ, गोतमारा, तरोडा, कजमपुर, खामखेड, राजुर, वारूळी, दाभा, निमखेड, ईसालवाडी, सहस्त्रमुली, कुऱ्हा, नळकुंड, खैरखेड,  हनवतखेड, गिरोली, मोहेगाव, आमदरी, खडकी, दाभा तांडा, मोहखेड आदीचा समावेश करण्यात आला आहे.