आतापर्यंत ‘देऊळ बंद 2 – आता परिक्षा देवाची’ या सिनेमानं चित्रपटगृहात उत्तम घौडदौड केली आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीपासून या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. 21 मे रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात अक्षरश: गर्दी केली. हा सिनेमा प्रदर्शित होऊन एकूण 12 दिवस झाले. 12व्या दिवशी या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत चांगलीच वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान प्रवीण दिग्दर्शित या सिनेमानं 12 व्या दिवशी नेमकं किती कोटींची कमाई केली? जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारीत या सिनेमाला देशांतर्गक चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. प्रदर्शनाच्या 10 व्या दिवशी या सिनेमानं 5 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, 11 व्या दिवशी या सिनेमानं 5 कोटी 75 लाखांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
शनिवार म्हणजेच 10 व्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत रविवारी म्हणजेच 11 व्या दिवशी या सिनेमानं जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. कमाईत 75 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 11व्या दिवशी या सिनेमाचे 2,015 शोज झाले. यातून 5.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले आहे. आज या सिनेमाच्या प्रदर्शनाचा दुसरा सोमवार. 12 दिवसांत हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवतोय? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
देशांतर्गत या सिनेमानं आतापर्यंत 44.66 कोटींचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर, 52.55 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. दरम्यान, हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल. ‘देऊळ बंद 2’ या सिनेमाचं बजेट साधारण 8 ते 10 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच ‘देऊळ बंद 2’ या सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात तिप्पट कमाई केली.
‘देऊळ बंद 2’ सिनेमाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची कथा आणि पटकथा प्रवीण तरडे यांचीच आहे. या सिनेमात मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे. मोहन जोशी यांनी या सिनेमात श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली आहे. तर, स्नेहल तरडे यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली. दोन्ही कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना सिनेमाच्या शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.
















Leave a Reply