कृती सेनॉन हिच्यावर चित्रीत वादात सापडलेली जाहिरात अखेर हटवण्यात आली आहे. जी जाहीरात जिवा’च्या दागिन्यांसाठी रक्षाबंधन संधर्भात चित्रित होती. जाहिरातीत अभिनेत्रीने घातलेल्या तोकड्या कपड्यांवरुन वाद सुरु झालेला. त्या कंपनीने सांगितल्यानुसार, भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांबद्दल आमच्या मनात अत्यंत आदर आणि सन्मान आहे. एक ब्रँड म्हणून, आम्ही नेहमीच हे आनंदाचे क्षण संपूर्ण कुटुंबासोबत साजरे करण्यावर विश्वास ठेवला आहे आणि या वेळी आम्हाला हे प्रेम आणि उत्सव आमच्या पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचवायचं होतं. जर आमच्या जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना नकळतपणे दुखावल्या गेल्या असतील, तर तसा आमचा मुळीच हेतू नव्हता…आदर म्हणून, आम्ही सदर जाहिरात सर्व माध्यमांमधून मागे घेतली आहे. या सणासुदीच्या काळात तुम्हा सर्वांना प्रेम आणि सकारात्मकतेच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिनेत्री कंगना रनौत या म्हणाल्या, ‘महिला कोणत्याही प्रकारचे कपडे घालू शकतात. पण भावाला बिकिनी घालून राखी कोण बांधतं…?’ असं त्या म्हणाल्या, त्यानंतर राहूल गांधी यांनी कृती हिचं समर्थन केलं.
इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत कंगना म्हणाल्या, ‘आजच्या दिवसांत महिला त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालू शकतात. त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. वेस्टर्न ड्रेसपासून लेहेंगा, जीन्स, साडी, बिकीनी आणि सलवार – कुर्ती सर्वकाही आहे. इतके सारे पर्याय असताना, कोणती महिला भावाला बिकिनी घालून राखी का बांधेल?’, कंगना असं देखील म्हणाल्या.












Leave a Reply