kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! मध्य रेल्वेच्या २४६ स्पेशल गणपती ट्रेन घोषीत

१) सीएसएमटी, मुंबई- सावंतवाडी रोड – सीएसएमटी, मुंबई दैनिक विशेष गाडी (३२ फेऱ्या )

ट्रेन क्रमांक 01103 दि. ११ ते दि. २६ सप्टेंबर या काळात दररोज सीएसएमटी येथून दु. ३.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता पोहोचेल. (१६ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01104 दि. १२ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दररोज सावंतवाडी रोड येथून सकाळी ४.३५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी, मुंबई येथे त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता पोहोचेल. ( १६ फेऱ्या)

थांबा: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

२) सीएसएमटी, मुंबई – सावंतवाडी रोड – सीएसएमटी, मुंबई – दैनिक विशेष गाडी ( ३४ फेऱ्या )

विशेष ट्रेन क्रमांक 01151 दि. ११ ते दि. २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज सीएसएमटी, मुंबई येथून रात्री १२.२५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता पोहोचेल. (१७ फेऱ्या )
विशेष ट्रेन क्रमांक 01152 दि. ११ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दररोज सावंतवाडी रोड येथून दु. ३.३५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दु.०४.३५ वाजता पोहोचेल. (१७ फेऱ्या)

थांबा : दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप

डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन


३) सीएसएमटी, मुंबई – रत्नागिरी – सीएसएमटी, मुंबई दैनिक विशेष गाडी (३२ फेऱ्या)

  • विशेष ट्रेन क्रमांक 01153 दि. ११ ते दि. २६ सप्टेंबर या काळात दररोज सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी रात्री ८.२५ वाजता पोहोचेल. ( १६ फेऱ्या ) परतीची ट्रेन क्रमांक 01154 दि. १२ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दररोज रत्नागिरी येथून पहाटे ४.०० वाजता सुटेल आणि सीएसएमटी, मुंबई येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ( १६ फेऱ्या)

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन


४) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष गाडी (३४ फेऱ्या )

गाडी क्रमांक 01171 विशेष गाडी दिनांक ११ ते दि. २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता पोहोचेल. (१७ फेऱ्या )
 परतीची क्रमांक 01172 विशेष गाडी दि. ११ ते दि. २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून रात्री २२.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल. (१७ फेऱ्या )

थांबा: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.


५) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (८ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01131 विशेष गाडी दि.१७ ते दि. २७ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता पोहोचेल. ( ४ फेऱ्या )
परतीची ट्रेन क्रमांक 01132 विशेष गाडी दि. १७ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दर गुरुवारी आणि रविवारी सावंतवाडी रोड येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)

थांबा: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची रचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन


६) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (४ फेऱ्या )

ट्रेन क्रमांक 01129 विशेष ट्रेन दि. १५ आणि दि. २२ सप्टेंबर रोजी मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )
परतीची ट्रेन क्रमांक 01130 विशेष गाडी दि. १५ आणि दिनांक २२ सप्टेंबर रोजी मंगळवारी सावंतवाडी रोड येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )

थांबा: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
७) लोकमान्य टिळक टर्मिनस – रत्नागिरी – लोकमान्य टिळक टर्मिनस (आठवड्यातून ५ दिवस) विशेष गाडी (२२ फेऱ्या )

  • ट्रेन क्रमांक 01167 विशेष ट्रेन दि. १२ ते दि. २६ सप्टेंबर या काळात दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९.०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता पोहोचेल. (११ फेऱ्या)
  • परतीची ट्रेन क्रमांक 01168 विशेष ट्रेन दि. १३ ते दि. २७ सप्टेंबर या काळात दर बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी येथून दु. ३.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.४० वाजता पोहोचेल. (११ फेऱ्या)

थांबा: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
८) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एसी विशेष गाडी (४ फेऱ्या)

  • ट्रेन क्रमांक 01165 वातानुकूलित विशेष गाडी दि. १५ आणि दिनांक २२ सप्टेंबर रोजी दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १२.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )
  • परतीची ट्रेन क्रमांक 01166 एसी विशेष गाडी दि. १५ आणि दि. २२ सप्टेंबर रोजी दर मंगळवारी मडगाव येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )

थांबा : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे, थिवि आणि करमळी.

डब्यांची रचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय,आणि २ जनरेटर व्हॅन्स.

९) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (४ सेवा) गाडी क्रमांक 01185 विशेष दिनांक १६.०९.२०२६ आणि दिनांक २३.०९.२०२६ रोजी दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा) गाडी क्रमांक 01186 विशेष दिनांक १६.०९.२०२६ आणि दिनांक २३.०९.२०२६ रोजी दर बुधवारी मडगाव येथून १६.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबा : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे (केवळ गाडी क्रमांक 01185 साठी), थिवि आणि करमळी.

डब्यांची रचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
१०) पुणे – रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (४ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01445 वातानुकूलित साप्ताहिक विशेष दर मंगळवार दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )

गाडी क्रमांक 01446 वातानुकूलित साप्ताहिक विशेष दर मंगळवार दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या )

थांबा : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

गाडीची रचना: ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
११) पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाड्या (६ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01447 साप्ताहिक विशेष दर शनिवार दिनांक १२, १९ आणि दि. २६ सप्टेंबर रोजी पुणे येथून  रात्री १२:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या )
परतीची गाडी क्रमांक 01448 साप्ताहिक विशेष दर शनिवार दिनांक १२.०९.२०२६, दिनांक १९.०९.२०२६ आणि दिनांक २६.०९.२०२६ रोजी रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या )

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना: २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
१२) दिवा – खेड – दिवा मेमू दैनंदिन अनारक्षित विशेष गाड्या (३२ फेऱ्या )

(दिनांक २२.०९.२०२६ वगळून)

गाडी क्रमांक 01155 मेमू विशेष गाडी दिनांक ११ ते दिनांक २७ सप्टेंबर या कालावधीत ( दि.२२.०९.२०२६ वगळून)

दिवा येथून सकाळी ०७.१५ वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचेल. ( १६ फेऱ्या )

गाडी क्रमांक 01156 मेमू विशेष गाडी दिनांक ११ ते दिनांक २७ सप्टेंबर या कालावधीत ( दि. २२.०९.२०२६ वगळून) खेड येथून दु. ४. ०० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी रात्री १०.५० वाजता पोहोचेल. (१६ फेऱ्या )

थांबा : निळजे, तळोजा पंचनद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक.

डब्यांची रचना: १२ डब्यांची मेमू रॅक.
१३) दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्या (३० फेऱ्या )

( दिनांक २३.०९.२०२६ /दिनांक २४.०९.२०२६ रोजी वगळून )

गाडी क्रमांक 01133 मेमू विशेष गाडी दिनांक ११ ते दिनांक २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज ( दि. २३ सप्टेंबर २०२६ वगळून) दिवा येथून दु. १.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल. ( १५फेऱ्या )

गाडी क्रमांक 01134 मेमू विशेष गाडी दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २८.०९.२०२६ या कालावधीत दररोज ( दिनांक २४.०९.२०२६ वगळून ) चिपळूण येथून सकाळी ०७.३० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी दुपारी १.०० वाजता पोहोचेल. (१५ फेऱ्या )

थांबा : निळजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी.

डब्यांची रचना : 12 कार मेमू रेक

“आरक्षण”. गणपती विशेष आरक्षित गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) खालीलप्रमाणे सुरू होईल: –

दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी गाडी क्रमांक 01153, 01445, 01167 आणि 01447

दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी गाडी क्रमांक 01165 आणि 01185

दिनांक ०३ ऑगस्ट २०२८ रोजी गाडी क्रमांक 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *