kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“स्वतःची काळजी घ्या, तब्येत जपा”, हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता व दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनयाशिवाय तो अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत आपलं मत मांडतो. सध्या हेमंतने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी तीन मोठ्या सभा घेतल्या. बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चेहऱ्यावरही प्रचंड थकवा जाणवत होता. त्यामुळे सोमवारी (६ मे) त्यांचे बरेच कार्यक्रम रद्द करण्यात आले. मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत काळजी व्यक्त केली आहे.

हेमंत ढोमेने शरद पवारांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टद्वारे त्यांना काळजी घ्या अशी विनंती केली आहे. बारामतीमध्ये शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी एकूण तीन सभा घेतल्या. परंतु, शेवटची सभा पार पडण्यापूर्वीच शरद पवार यांची प्रकृती बिघडली व पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले.

हेमंत ढोमेने ट्विट करत शरद पवारांना काळजी घेण्याची विनंती केली आहे. “आदरणीय साहेब…आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे… पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा…खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो…” असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.