बारामतीनंतर आता पुणे लोकसभा निवडणुकीकडे महायुतीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडत आहे. बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. १३ मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान पर पडतंय त्याच्या संदर्भात रणनीती आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघात मतदानाचा टक्का घसरला. बारामतीमध्ये केवळ 56.07 टक्के मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा ते नऊ टक्के कमी आहे. यामुळे याचा फटका कोणाला बसणार? याची चर्चा सुरु झाली आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात आज महायुतीची बैठक होत आहे. १३ मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान होणार आहे. संदर्भात रणनीती आखण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे.

पुण्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला खिंडार पडले आहे. एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी लांडगे व एमआयएमचे नेते डॅनियल लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पुण्यात काल बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले. या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. वारजे माळवाडी हा भाग बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला मतदार संघात येतो. या ठिकाणी मतदान झाल्यावर रात्री ११ च्या सुमारास येथील रामनगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी हवेत तीन राऊंड फायर केले. या मुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.