मराठी चित्रपट परिवार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या पुणे लघुपट महोत्सवात लेफ्टी या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक पटकावले, तर अविनाश पालकर यांना ग्रेट इंडियन ब्रेकअप या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. सविना या लघुपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक, लेखक श्रीकांत कुलकर्णी, ज्येष्ठ छायाचित्रकार राम झोंड, ज्येष्ठ लेखक सुभाष चंद्र जाधव यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सह विविध राज्यातील लघुपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतल. पंधराहून अधिक विविध विभागांमध्ये महोत्सवातील सर्वोत्कृष्ट लघुपटांना पारितोषिके देण्यात आले.

जिंदगी एक कश्मकश या लघुपटला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट म्हणून गौरविण्यात आले. कश्मकश या लघुपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शकनाचे पारितोषिक मिळाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित असणाऱ्या द लोंग रोड या लघुपटासाठी अनुराग दळवी यांना सर्वोत्कृष्ट भारतीय पटकथा लेखक म्हणून पारितोषिक देण्यात आले. सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटांमध्ये वंश या लघुकथाला सर्वोत्कृष्ट लघुपाटाचे पारितोषिक मिळाल, तर चीमे या लघुकथासाठी सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शनाचे पारितोषिक देण्यात आले. कप ऑफ टी या लोकपाटाला सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा लेखनाचे पारितोषिक देण्यात आले. शेक्सपियर या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट प्रथम निर्मिती लघुपट पारितोषिक मिळाले तर वृंदावन या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट प्रथम दिग्दर्शन पारितोषिक देण्यात आले. खंड्या या लघुकथांसाठी सर्वोत्कृष्ट प्रथम लेखनाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.