भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्राच्या लोक कलेचा सन्मान व्हावा याकरिता सांस्कृतिक कला महोत्सव २०२४ लावणी महोत्सव व महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाचे आयोजन ३० जुलै २०२४ रोजी , सकाळी ११ ते रात्री १० वाजता,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्दमावती,पुणे येथे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये लोककलेचे योगदान अमूल्य असे आहे परंतु दिवसेंदिवस लोप पावत चाललेली लोककला, आधुनिक काळामुळे पारंपरिक लोक संगीताचा विसर पडला जात आहे, लोक कलावंतांना रोजगार निर्मिती, लोककलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच लोककलावंतांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी, लावणी या ऐतिहासिक लोककलेला सन्मान मिळावा यासाठी पक्ष नेहमीच अग्रेसर राहिला असुन त्याच उद्देश्याने महाराष्ट्राच्या लोककलेचा सन्मान व्हावा यासाठी भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ च्या वतीने सांस्कृतिक कला महोत्सव २०२४ लावणी महोत्सव व महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, लावणी सम्राज्ञी सिमा पोटे नारायणगावकर, सुधाकर पोटे नारायणगावकर, सिनेअभिनेत्री सुरेखा कुडची, सिनेअभिनेत्री मेघा घाडगे, अकलूज लावणी महोत्सव विजेता ग्रुप जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी ची वैशाली समसापुरकर ग्रुप चा संगीतबारी कार्यक्रम, नितीन मोरे व महेश भांबीड दिग्दर्शित महाराष्ट्राची लोकधारा, ढोलकीच्या तालावर फेम शुभम बोराडे अशा सुप्रसिद्ध लोक कलावंतांच्या कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे.

या महोत्सवाला राज्याचे मा.श्री. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्यसभा सदस्य सौ. मेधाताई कुलकर्णी, महामंत्री विजय चौधरी, विक्रांत पाटील, आ.माधुरीताई मिसाळ, आ. सुनील कांबळे, आ. महेशदादा लांडगे, आ. भिमराव तापकीर, आ. सिध्दार्थ शिरोळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धिरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, रा. कॉ (अजित पवार गट) शहराध्यक्ष दिपक मानकर, उद्योजक पुनीत बालन, बाळासाहेब दाभेकर (अध्यक्ष-भरत मित्र मंडळ), उद्योजक मंगेश मोरे, सांस्कृतिक प्रकोष्ट शहराध्यक्ष जतिन पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या महोत्सवात लोककेलसाठी ज्यांनी मोलाचे योगदान देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जेष्ठ तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे, शाहीर वसंत अवसरिकर, जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, जेष्ठ लावणी सम्राज्ञी शकुंतला नगरकर, अमन तांबे आर्यभूषण थियटर, ढोलकी वादक तुकाराम शितोळे, मुरळी रेणुका जेजुरीकर, लोकगीत चंदन कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.तर विधान परिषदेवर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आ.पंकजाताई मुंडे, आ.योगेश टिळेकर, आ. परिणय फुके, आ. अमित गोरखे, आ.सदाभाऊ खोत यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे यामध्ये अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची विनामूल्य मेजवानी रसिकांना मिळणार असल्याने मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक प्रियाताई बेर्डे (प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र), महेश भांबीड, सोनु मारुती चव्हाण(उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश) यांनी केले आहे.