Breaking News

“माझं बोलणं दिसतं, पण जरा स्वच्छता पाळा ना..” ; मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील माहेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेले. त्याठिकाणी प्रवेशद्वारावरील अस्वच्छता पाहून अजित पवार यांनी मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं आहे. अजित पवार हे कालपासून १५ ऑगस्ट आणि जनसन्मान यात्रेनिमित्ताने पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडल्यानंतर ते आज सकाळी पुण्याच्या रविवार पेठेतील एका सोन्याच्या दालनाच्या उद्घाटनासाठी आले होते. ते झाल्यावर शेजारील माहेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेले. त्याठिकाणी प्रवेशद्वारावरील अस्वच्छता पाहून अजित पवार यांनी मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं आहे.

मला मंदिराबाहेर आल्यावर घाण दिसली. तुमचं मंदिर एवढं छान आहे. एवढे भक्त दररोज येतात. महानगरपालिका नंतर येऊन झाडेल तेव्हा झाडेल. तुम्ही स्वच्छ करायचं ना मंदिर. आपण आपलं करायला हवं. बरोबर नाही हे तुमचं, तुम्हाला माझं बोलणं दिसत मग चांगलं ठेवा ना तिकडं काय वायरी बाहेर आल्या आहेत. व्यवस्थित करून घ्या ना सगळं असं म्हणत अजित पवारांनी सदस्यांना सुनावलं आहे.

आम्ही सर्व नागरिकांना चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या भगिनी उच्च शिक्षण घेऊन सक्षम बनाव्यात यासाठी त्यांना उच्च शिक्षण मोफत केलं आहे. भावाच्या नात्यानं मी प्रगतीच्या प्रत्येक वाटेवर तुमच्या सोबत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आज ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले, त्या भगिनी मला येऊन भेटल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुखावणारा होता. आम्ही राज्याचा विकास साधू, परंतु महायुतीच्या सरकारला तुम्ही आशीर्वाद द्यावा, पाठबळ द्यावं, अशी विनंती अजित पवारांनी मेळाव्यात केली.