टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बतमी समोर येत आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विकास सेठी आहे. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने बायको आणि जुळ्या मुलांना सोडून वयाच्या 48 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी देखील श्रद्धांजली वाहत आहे.
विकास सेठी याच्या निधनामुळे टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे. 2002 पासून विकास घरा-घरात प्रसिद्ध होता. अभिनेत्याने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. आता अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबिय, चाहते आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
रिपोर्टनुसार, 8 सप्टेंबर, रविवारी विकास याचं निधन झालं. झोपेच अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा रंगली आहे. पण अद्यापही विकास सेठी याच्या कुटुंबियांकडून कोणतं अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.
विकास सेठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचा. अभिनेता कायम पत्नी आणि जुळ्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा. अभिनेत्याने शेवटची पोस्ट 12 मे रोजी केली होती. ज्यामध्ये अभिनेता त्याच्या आईसोबत दिसला.