पूजा चव्हाण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अयोध्या पोळ यांनी एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?

मयत तरुणी आणि मंत्री एकमेकांना कसे भेटले ?, मयत तरुणीचे हिंगोली कनेक्शन कसे आहे ?, मंत्र्याला हे प्रकरण दाबण्यासाठी कशी कोणाकडून मदत मिळाली ?  असे मुद्दे उपस्थित करत नेमकं त्या काय म्हणाल्या आहेत हे खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला पाहता येईल.

अयोध्या पोळ यांचे पूजा चव्हाण प्रकरणात नवे खुलासे, कोण टार्गेटवर?

कोण आहे पूजा चव्हाण ?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरुणी मूळची परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी. गेल्या काही दिवसांपासून ती पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती. पूजाने एका मंत्र्यामुळे आत्महत्या केल्याच्या चर्चा आहेत.

अयोध्या पोळ यांची क्षितिज न्यूजशी एक्सक्लुझिव्ह बातचीत :

खूप पॉझिटिव्हिटी लोकांमध्ये होती. एक छोट्या समाजातून एक मुलगी पुढे येऊ इच्छिते आणि मी एक मुलगी आहे मलाही अनेक संकटे आली आहेत. ती आव्हान, तो त्रास मी समजू शकते. एवढ्या सगळ्यांमधून ती वर आली होती आणि ती माझ्या पक्षाच्या ज्येष्ठांना भेटण्यासाठी त्या मंत्र्याला भेटली  होती. तिला वेगळीच भुरळ पाडली गेली. तिच्यासोबत बाकीच्या २४ – २५ मुली होत्या त्या सगळ्या आपापल्या घरी गेल्या. कारण त्या मुलींना भनक लागली की  इथे आपलं काही होणार नाही.

ऊस तोडणी कामगारच्या त्या मुली होत्या, शेतकरी , कष्टकरीच्या मुली होत्या. या मंत्र्याने जर तिला फसवलं नसत, तिला भुरळ घातली नसती आणि ते वय कस असत .. चूक मुलीचीही म्हणता येणार नाही. त्या त्या वेळेस योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही तर माणूस भरकटतो. जर या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत झाल्या नसत्या तर ती आज एक समाजासाठी एक उदाहरण झाली असती एवढं नक्की सांगते.

ती रिल्स वगैरे बनवायची, तिची तरुणाईंमध्ये क्रेझ होती. तिला जर योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर तिने काहीतरी केलं असतं. आता तीच पाऊल भरकटल, ते झगमगाट वगैरे बघून तीच पाऊल भरकटल गेलं, की कोणीतरी जाणूनबुजून तिचं पाऊल भरकटवलं हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. एका समाजातून मुलगी पुढे येत आहे तर तिला असं नाही तर तस दाबायचं. समोरच्याचा काय हेतू  होता माहित नव्हतं पण यातून एका  चांगल्या मुलीचा जीव गेला.

समाज कुठलाही असो, जात धर्म कुठलाही असो जेव्हा तुम्ही समाजामध्ये होणाऱ्या घटनांबद्दल बोलत असाल तर तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पुरुषप्रधान संस्कृती आहे. पण सगळीकडे असे असतेच असे नाही. माझ्या   घरामध्ये माझ्या बाबांनी माझ्या आईला प्राधान्य दिले आहे. माझा भाऊ त्याच्या बायकोला, आईला, बहिणीला प्राधान्य देतो. तुमच्या घरामध्ये कशा मानसिकतेची लोक आहेत यावर पण ते अवलंबून आहे.

आपण पुरुषप्रधान संस्कृती म्हणतो. आज पोलीस दलात महिला देखील खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. महिला ही कुठल्याही पक्षातली  असो कुठल्याही जातीची, धर्माची असो जर महिला पुढे येत असेल तर हे फक्त बोलण्यापुरतं आहे की तुम्ही खरंच महिलांना पुढे आणू इच्छित आहेत का ? हा देखील एक प्रश्न आहे.

पक्षाची, उद्धव ठाकरे यांची याबाबतची भूमिका काय ?

माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महिलांच्या प्रश्नांबाबत, मुद्द्यांबाबत संवेदनशील आहेत. म्हणूनच या प्रकरणात त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता. त्यांना पक्षापासून दूर ठेवलं. तो इकडे जरी असता तरी त्याचे राजकीय भविष्य पुढे काहीच नसत याची खबरदारी नक्कीच उद्धव साहेबांनी घेतली असती एक सदस्य म्हणून या नात्याने मी सांगते.  जे जे लोक उद्धवसाहेबांना ओळखतात त्या प्रत्येकाला माहित आहे की उद्धव ठाकरे हे महिलांच्या बाबतीमध्ये अजिबात तुम्हाला एन्टरटेन्ट करत नाहीत.

पूजा चव्हाण प्रकरण असो किंवा बदलापूरमधील घटना असो … या घटनांमागील कारण काय वाटतं ?

याबाबत बोलताना अयोध्या पोळ म्हणाल्या की,  हा उत्तम प्रश्न विचारण्यात आला आहे. घरामध्ये तुम्हाला शिकवण खूप महत्वाची असते. तुम्ही किती एज्युकेटेड फॅमिलीमधून येता , तुम्ही किती मॉडर्न फॅमिलीमधून येता हे महत्वाचं नाही तर तुम्ही सपोर्टिव्ह आई वडिलांकडून येता हे महत्वाचं असत. 

यासाठी तुम्ही माझे उदाहरण घेऊ शकता. माझ्या वडिलांनी माझ्या भावाला घरामध्ये स्वयंपाक शिकवला. त्याला महिलांबाबत आदर करायला शिकवला आहे. त्याला  एकही मैत्रीण नाही. दुसऱ्यांच्या मुलीला स्वतःच्या बहिणीच्या जागी बघायचं, वयस्कर महिलांना आईच्या जागी, मावशीच्या जागी, मामीच्या जागी बघायचं. याचबरोबर, आमच्या आई वडिलांनी हे शिकवलं आहे, आम्हाला सांगितलं आहे की, तुमचा होणार प्रत्येक मित्र , तुमची होणारी प्रत्येक मैत्रीण आम्हाला कळली पाहिजे. तुम्हाला कोणत्याही धर्माचा , जातीचा मुलगा/ मुलगी आवडेल घरी येऊन सांगायचं. आज माझे मित्र – मैत्रिणी हे माझ्या कमी आणि माझ्या आई बाबांशी जास्त बोलतात.  दिवसातून एक किंवा दोन फोन त्यांना असतात.



तरुण पिढीने राजकारणावर बोलायला हवे

मला एका गोष्टीचं रिग्रेट आहे की मी आधी राजकारणात ऍक्टिव्ह का झाले नाही.  शिकलेल्या तरुण पिढीने राजकारणावर बोलायला हवे. राजकारणाबद्दल त्यांनी विचार करायला हवा. त्यांनी राजकारण्यांबद्दल आणि विशेषतः अश्लील राजकारण्यांबद्दल बोलायला पाहिजे. आपण भाषणापुरत म्हणतो की तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. तुम्ही तरुणांना कोणत्या ठिकाणी संधी देत आहात ? आमदारकीसाठी, खासदारकीसाठी, नगरसेवकपदासाठी तुम्हाला एखादा वयस्करच माणूस लागतो. एखादा ३५-४० च्या पुढचाच  माणूस लागतो. का तुम्ही एखाद्या तरुणाला संधी देत नाही ? का तुम्हाला असं वाटत की तो लहान आहे म्हणजे तो इनमॅच्युअर असेल.

काही  लोक जबाबदारीमुळे १०-१२ वर्षापासूनच मॅच्युअर झालेली असतात. भारतीय संविधानाने १८ व्या वर्षांपासून मतदानाचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे १८ व्या वर्षी तुम्ही मतदान करू शकता म्हणजे तुम्ही निवडणुकीला देखील उभे राहू शकता. मतदान करण्याची मॅच्युरिटी जर संविधानाने तुम्हाला दिली आहे तर तुम्ही निवडणुकीसाठी त्याचे  ३५-४० वय का बघता ?

अनेक नेते अयोग्य भाष्य करतात. अशावेळेस मॅच्युरिटी आणि वयाचा संबंध असेल असे वाटते का ?

जर मॅच्युरिटी असती तर अश्लील पद्धतीने बोलणं, अश्लील पद्धतीने वागणं झालं नसत आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे समजायला पाहिजे. तुम्ही या क्षेत्रात आला आहात म्हणजे तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागता आणि तुम्हाला समाजाचं ते देणं फेडायलाच हवं मी या मताची आहे.

 मग तुम्ही ते फेडता का तर नाही फेडत. तुम्ही दोन समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करता. एखाद्याला तृतीयपंथांवरून शिवी देता म्हणजे तुम्ही त्याचा अपमान करता. तुम्ही या सगळ्या गोष्टी करता, मग कशासाठी करता ? तुम्हाला तुमची बुद्धी वापरायची नसते म्हणून का तुम्हाला शिक्षण नसत म्हणून, की  तुम्हाला यांबद्दल माहिती नसते की आपल्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते किंवा सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकतं.

गेल्या दहा वर्षांमध्ये सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह झालं. या दहा वर्षांमध्ये तुम्हाला पब्लिसिटी किंवा पब्लिसिटी स्टंट समजायला लागलं. तुम्हाला सगळ्या गोष्टींचं भान आहे पण तरीही बोलणं म्हणजे आपल्याला कुठल्यान कुठल्या विषयासाठी चर्चेत राहायचं आहे. चर्चेत राहण्यासाठी ही बेताल वक्तव्ये केली जातात.  असाही त्याचा अर्थ होतो.

फेमिनिस्ट हा शब्द सकारात्मक पद्धतीने घेतला पाहिजे

खरे फेमिनिस्ट माझ्या बाबांना आपण म्हणू शकतो.  फेमिनिस्ट हा शब्द आपल्याकडे खूप नकारत्मक पद्धतीने घेतलेला आहे.

माझा भाऊ मला दादा म्हणतो. तर मला असे वाटते की फेमिनिस्ट या शब्दाला आपण सकारत्मक पद्धतीने घेतले पाहिजे. महिलांना पुढाकार देणं,  महिलांना पुढे आणणं किंवा महिलांना प्रोत्साहन देणं म्हणजे फेमिनिस्ट असत असं मला वाटतं. मी लहानपणापासून माझ्या घरामध्ये देखील हे पाहत आहे.

माझ्या पक्षाने देखील महिलांचा उल्लेख ‘रणरागिणी’ म्हणून केला आहे. माझ्या पक्षाने स्त्रियांना रणरागिणी ही उपाधी दिली आहे. मला लहानपणापासूनच पोषक वातावरण मिळाले आहे. म्हणूनच मी हा शब्द सकारत्मकतेने घेते. समाजाने देखील या गोष्टीला सकारत्मक पद्धतीने घ्यायला पाहिजे.

लोकांचा प्रतिसाद आणि समर्थन मिळत आहे

या प्रकरणात प्रत्यक्षरित्या विरोध करण्याची कोणाची हिंमत नाही. पण अप्रत्यक्षरीत्या जर कोणी विरोध करत असेल जर उदाहरणार्थ ४ लोक विरोध करत असतील तर ४० जण समर्थन देणारी आहेत. असे मी म्हणेन. मला समर्थन जास्त मिळत आहे. सोशल मीडियावर आधीच्या व्हिडिओला आणि बाईटला खूप चांगला प्रतिसाद मिळत मिळत आहे हे दिसून येत आहे.

माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर  …

आज मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की या प्रकरणात किंवा इतर कोणत्याही अन्यायाच्या बाबतीत बोलत असताना माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर माझी एक इच्छा अशी आहे की उद्धवसाहेबांनी माझ्यावर फुल वाहून श्रद्धांजली वाहिली पाहिजे. त्यानंतरच माझा मृतदेह अंत्यविधीसाठी मुंबईहून माझ्या गावी गेला पाहिजे.