आज आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. यावेळी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यमान आमदारांमधील बहुतांश आमदारांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. आजच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांना एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला असल्याचे समजते.

रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुंषगाने तयारी सुरू केलीय. आजच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांना एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला असल्याचे समजते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून 20 ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर उमेदवारांची यादी जाहीर करुन उमेदवारांना प्रचारासाठी मैदानात उतरवले जाणार आहे. त्यामुळे आजच विद्यमान आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षप्रमुखांकडून एबी फॉर्म दिले गेल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्यातील बहुतांश आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट निश्चित मानले जात आहे. ज्या आमदारांना मुहूर्तावर एखादा दिवस ठरवून एबी फॉर्म घेऊन जायचं आहे, ते आमदार त्यादिवशी एबी फॉर्म घेऊन जातील, असेही समजते.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे. लोकसभा निवडणुकांवेळी ज्या काही त्रुटी महाविकास आघाडीतील पक्षांना जाणवल्या, त्या दृष्टिकोनातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचे निवारण राज्य निवडणूक आयोगाने करावे, यासाठी ही भेट असल्याचे देखील या बैठकीतील उपस्थित आमदारांकडून समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *