Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर बाईच्या नाचावर राज ठाकरे यांची संतप्त टीका

डोंबिवली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर सोमवारी झालेल्या सभेत भोजपुरी गाण्याच्या ठेक्यावर एक बाई नाचली. याबद्दल राज ठाकरे यांनी डोंबिवली येथील सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून, मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. या घाणेरड्या राजकारणामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे असे सांगितले.

डोंबिवली येथे पी एन्ड टी कॉलनीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण ग्रामीण येथील विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी संतप्त होत हे राज्य वाचवायला पाहिजे. हा महाराष्ट्र टिकला पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असून या महाराष्ट्रासाठी जागे राहा. जिवंत रहा. या महाराष्ट्रावर अनेकांचा डोळा आहे . काही गोष्टी येथे चाललेल्या त्या बंद झाल्या पाहिजेत. महाराष्ट्राचा हेवा वाटावा या महत्वकांसेपोटीच मी लढायला उभा राहिलो आहे. मला सत्ता द्या असे पुन्हा एकदा त्यांनी जनतेकडे मागणी केली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील राज ठाकरे यांनी टीका केली ज्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे २०१९ च्या निवडणुकीत लढले त्यांच्यासोबतच ते जाऊन बसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सांगितले की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असे असताना सुद्धा अडीच वर्ष शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपद चार भिंतीच्या आत चर्चा झाल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मागितले. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित यांना उद्धव ठाकरेंनी विरोध का केला नाही. असा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारला. निकाल लागेपर्यंत त्यांनी आक्षेप का घेतला नाही. शिवसेनेचे धनुष्यबाण आणि शिवसेना हे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांची मालमत्ता नसून , ती बाळासाहेब ठाकरेंची आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह फक्त शरद पवार यांचेच असल्याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याची टीका राज ठाकरे यांनी शरद पवारांनी वर केली. पूर्वी आमदार फोडाफोडीचे राजकारण असायचे. आता मात्र पक्ष, निशाणी, नाव ताब्यात घेण्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे. मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी कोरोना काळात आपलं इस्पितळ देऊन एक फार मोठी सेवा केली होती. राजू पाटील यांनी डोंबिवली आणि ठाणे येथे चांगले काम उभे केले असून राजू पाटील यांना पुन्हा एकदा निवडून आणा आहे असे आव्हान त्यांनी उपस्थितांसमोर केले.

सभेच्या सुरुवातीला माजी आमदार रमेश पाटील यांनी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेसाठी मनसेचे माजी आमदार माजी नगरसेवक तसेच ज्येष्ठ पदाधिकार, कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.