राज्यातील राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे वाद पहायला मिळत आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सॅलियन यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात येत आहेत. भाजप आमदार नितेश राणेंकडून हे आरोप सातत्यानं केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत. तर उद्धव ठाकरेंनी मानलेल्या आभारावरुन शर्मिला ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय. मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का? असा सवाल शर्मिला ठाकरेंनी केली आहे.

उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर केलेल्या टीकेला शर्मिला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी त्यांनी कधीच आम्हाला दिली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत.मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. मात्र आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही. लहान भावाला कायम बोलतात टोमणे मारायची संधी सोडत नाहीत.

अदानींना प्रश्न केला, चमचे का वाजू लागलेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आहे. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, दीड वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीवर भेटायला कशाला गेले होते हे तुम्ही शोधा. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांचे हात धरले होते का? चांगले निर्णय घ्यायला त्यांना कोणी थांबवलं होतं? सर्व विरोधी पक्ष नेते म्हणतात की, आरक्षण द्या पण मराठा आरक्षण त्यांनी का दिल नाही? तुम्हाला कोणी थांबवलं होत? शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसला होतात. धारावीचा पुनर्विकास करायचा होता मग तुम्ही का केला नाही साहेबांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.

राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य यांची पाठराखण केली आहे. मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल, चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय, अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे.