“अनिल देशमुख यांच्यावर काल नागपुरात हल्ला झाला. अत्यंत निर्घृण हल्ला झाला. ते रक्तबंबाळ झाले. काल ते अत्यवस्थ होते. हा हल्ला होत असताना भाजपा जिंदाबादच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. राज्याच्या माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याच्या हेतूने हा हल्ला होता. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात हे होतं. हे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे निघालेले धिंडवडे आहेत. याला देवेद्र फडणवीस आणि मिंधे सरकार जबाबदार आहे” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
“निवडणूक काळात राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र निवडणूक आयोगाकडे असतात. तरीही, या भाजपाच्या काळात गृहमंत्र्यांचा आदेश चालतो. कारण निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असतो. त्यांचीच माणसं असतात. ऐकमेकाला धरुन काम करतात. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कायदा-सुव्यसवस्था रसताळला गेलेली आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“उद्याची निवडणूक सकाळपासून होणार आहे. आम्हाला चिंता वाटते. आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील, हल्ले होतील. किती जणांवर खोटे गुन्हे दाखल होतील, या विषयी आम्हाला चिंता वाटते. हे प्रकार राज्यभरात सुरु झालेले आहेत. आज सकाळी उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली. फोनवरुन त्यांनी अनिल देशमुखांशी चर्चा केली. महाराष्ट्राला धक्का बसावा असं हे कालच प्रकरण आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“भाजपवाले म्हणतात, हे स्टंट आहे. नरेंद्र मोदींकडून आम्ही स्टंट शिकलेलो नाही. हे स्टंट तुमचे नेते, पंतप्रधान कायम करत असतात. देशमुखांच डोकं किती फुटलय ते पहा. डोक्यावर कशा पद्धतीने हल्ला झालाय पहा. देशमुखांचे चिरंजीव कटोलमधून उभे आहेत, ते निवडून येत आहेत. भाजपाची ही नौटंकी चालली आहे. महाराष्ट्रात असं वातावरण यापूर्वी कधी झालं नव्हतं. ते देवेंद्र फडणवीस, अमित शाहंच्या काळात झालं आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.