महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. दरम्यान, नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता मोबाईलवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
एका क्लिकवर शोधा तुमचे मतदान केंद्र
- मतदार संबंधित माहितीसाठी निवडणूक आयोगाचे अधिकृत पोर्टल electoralsearch.eci.gov.in/pollingstation वर भेट द्यावी.
- या वेबपेजवर ‘नो योर इलेक्टोरल सिस्टीम’ बॉक्स दिसेल. जिथे, मतदान ओळखपत्रावरील ईपीआयसी क्रमांक टाकावा.
- ईपीआयसी क्रमांक प्रविष्ट केल्यावर आपल्याला कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल आणि सर्चवर क्लिक करावे लागेल. सर्व नोंदणीकृत मतदारांच्या मतदान केंद्राचा तपशील दिसेल.
- मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपले मतदार ओळखपत्र किंवा आधारकार्डसारखे कोणतेही अधिकृत ओळखपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
- मतदारांनी मतदार यादीतील आपला तपशील नीट तपासून पहावा, जेणेकरून काही त्रुटी असतील तर, त्या अगोदर दुरुस्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.