राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. तर महायुतीचा वारू पुन्हा उधळला आहे. लोकसभा निवडणुकीतील मळभ झटकून एक है तो सेफ है आणि कटेंगे तो बटेंगेचा थेट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीत २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी शक्यता वाटत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिाय दिली असून महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले आहे.
लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय होत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले, संपूर्ण निकाल लागल्यानंतर आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ.
महाराष्ट्रात महायुतीची लाट दिसत असून भाजपाने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेना (शिंदे) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३८ जागांवर आघाडी कायम ठेवून आहे.