Breaking News

वाल्मिकसदर्भात येत असलेले सीसीटीव्ही आणि तो घेत असलेल्या सुविधेसोबत अधिकाऱ्यांशी बोलणार ; धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले पहा

संतोष देशमुख खंडणीप्रकरणी वाल्मिकने दाखल केलेल्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात जामीन अर्जावरील सुनावणी यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. एसआयटीने खंडणीप्रकरणी वाल्मीकच्या जामीनाला कडाडून विरोध केलाय. दरम्यान, माझा आता पोलीस यंत्रणेवर भरोसा राहिला नाही असा खळबळजनक आरोप सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मीक कराडसंदर्भात रोज नवीन व्हिडीओ येत आहेत. पहिला व्हिडीओ आला तेव्हा सर्व आरोपी, पोलीस त्याच्यासोबत होते. आता दुसरा व्हिडीओ पत्रकार समोर आणतायत पण पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे यंत्रणेवर मला शंका उपस्थित झाली असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. या आरोपींपर्यंत यंत्रणा का पोहोचली नाही? त्यांना कोणी पोहोचू दिले नाही? मी आज सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून यांसदर्भात प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी झी 24 तास शी बोलताना सांगितले.

सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मास्टर माईंड मकोकातील आरोपी वाल्मीक कराड हा राजकीय वरदहस्थामुळे कारागृहात असताना वैद्यकीय सुविधा उपभोगतो आहे. यामध्ये आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज प्रसार माध्यमांना मिळतात मात्र ते पोलिसांना सापडत नाहीत. एक किंवा ठराविक अधिकारी घेतले म्हणजे तपास निपक्षपाती होईल असे नाही. जे न्यायाच्या भूमिकेत नाहीत ते सर्व दाबाव आणत आहेत. वाल्मिकसदर्भात येत असलेले सीसीटीव्ही आणि तो घेत असलेल्या सुविधेसोबत अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड शिवलिंग मोराळेंच्या कारमधून राज्यभर फिरला, अशी सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भातील 2 सीसीटीव्ही फूटजे समोर आले आहेत, यात तिच कार दिसतंय, जी मोराळेंची असून याच्या कारमधूनच वाल्मिक सीआयडीसमोर शरण आले होते. शिवलिंग मोराळेंची कार वाल्मिकसोबत राज्यभर कसा फिरला? असा प्रश्न उपस्थितीत होतोय. मोराळेंचीच कार अजित पवारांच्या ताफ्यात होती का? असा प्रश्नही उपस्थितीत होतोय. शिवलिंग मोराळेंच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान त्यापूर्वी शिवलिंग मोराळेंनी बदनामीचा आरोप केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *