Breaking News

वास्तुकला प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न ;दि. २६ रोजी मा. उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देणार !!

‘अकॅडमिक एक्सप्लोरेशन्स्’ या विषयावर दि. २४ पासून ४ दिवस बालगंधर्व कलादालन येथे  आयोजित वास्तुकला प्रदर्शनाचे उद्घाटन आज ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक, क्रेडाईचे माजी अध्यक्ष, व आदित्य बिल्डर्सचे शांतीलाल कटारिया यांच्या हस्ते झाले. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अॅड . अभय छाजेड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजित दादा पवार बालगंधर्व कलादालन येथील या वास्तुकला प्रदर्शनास भेट देणार आहेत. 

आज दिप्राज्वालानाने प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. ‘पेहेले सरस्वती बादमे लक्ष्मी’ हा मंत्र लक्षात ठेऊन तरुणांनी प्रथम ज्ञान संपादन करावे , आर्थिक अडचणी ,भांडवलाची कमतरता, अशी करणे सांगत बसण्यापेक्षा जिद्दीने पुढे जाण्याची वृत्ती बाळगावी व शहराच्या विकासात शाश्वत योगदान द्यावे ,असे उद्घाटक शांतीलाल कटारिया, या प्रसंगी म्हणाले.


या प्रसंगी , संचालक प्रसन्न देसाई , अणि शेखर गरुड ,विजया श्रीनिवासन , रश्मी जोशी , ऋषीकेश अष्टेकर, यशश्री लांबे औरंगाबादकर, गुंजन माहेश्वरी , देवेंद्र देशपांडे समवेत संस्थेचे इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी नामवंत वास्तुरचनाकार श्री विकास भंडारी , चित्रकार श्री मुरली लाहोटी इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.

देशातील वास्तुकला विषयातील नामवंत अशा विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पुण्यातील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अकॅडमिक एक्सप्लोरेशन्स्’ हे प्रदर्शन दि. २७ जानेवारीपर्यंत सकाळी ९.०० ते रात्रौ ८.०० या वेळेत बालगंधर्व कलादालनात सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार आहे.
या प्रदर्शनात गेल्या पंधरा वर्षांपासून वास्तुकलेच्या शिक्षणात, महाविद्यालयाने केलेल्या योगदानाबद्दल माहिती आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड,सचिव जितेंद्र पितालिया व संचालक प्रसन्न देसाई यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *