kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश…

हिंगोली जिल्हयातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार गट, उबाठा आणि कॉंग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.

आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली आज शरदचंद्र पवार गटाचे भटक्या विमुक्त जाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूरसिंग बावरी, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव वानखेडे, कळमनुरी विधानसभा अध्यक्ष वसंतराव पतंगे, तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष हरिओम बर्वे, उबाठा गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख बाजीराव सवंडकर, युवा नेते कुलदीप देसाई, मारोती कदम, संदीप घुमणर, पंचायत समिती सभापती जगदीश गाडेकर, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव केरोजी नरवाडे, अल्पसंख्याक नेते मुजीब खान तय्यब खान पठाण आदींनी जाहीर प्रवेश केला.

यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे, हिंगोली जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार मनोज कायंदे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आदी उपस्थित होते.