आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते मुलूंडमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. म्हणाले , ” माझे आजोबा म्हणायचे, दगडाला शेंदूर लावला तर तो देव, नाही तर धोंडा आहे. आम्ही धोंडा आहोतच. जो कुणी आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर येईल, त्याचा कपाळमोक्ष करण्याची ताकद आमच्या या सर्व मराठी मनामध्ये आहे. आपण दगड बणून या सर्वांना सामोरे जायला हवे. म्हणजे त्या सर्वांची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे, अत्ताच संजय राऊत तुम्ही जे सांगितलंत, जसा पुतीन जिंकला, हिटलरसुद्धा जिंकला होता. हो हिटलरला सुद्धा ९० टक्के ९५ टक्के ९७ टक्के मते मळाली होती. पुतिनला सुद्धा आताच्या काळात बहुमत मिळाले आहे. तसेच यांनाही बहुमत मिळत आहे. हे बहुमत खरे मत नाही. हे सर्व लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे.”
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
पुढे म्हणाले, “मी तुम्हाला संबोधित करताना, ‘हिंदू बांधवांनो, भगिणींनो आणि मातानो’ म्हणाले, पण इकडे काही मुस्लीम असतील, ख्रिश्चन असतील, ते आपल्यासोबत आले, त्यांना आपले हिंदुत्व मान्य आहे, कारण आपले हुंदुत्व देशप्रेमाशी निगडित आहे. ते ज्यांना मान्य आहे, मग तो मुस्लीम असला तरी तो आमचा आहे. मी जाहीर सांगतो. माझे हिंदूत्व यांच्यासारखे नाही, इकडे पाकिस्तानचा निषेध करायचा आणि तिकडे दुबईमध्ये जाऊन पाकिस्तानी माणसासोबत हिंदुस्तान- पाकिस्तान सामना बघायचा. ही थेर मला बाळासाहेबांनी शिकवलेली नाहीत.”
“इकडे ५६ इंचांची छातीही फेक नरेटिव्ह आणि तिकडे जाऊन नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक खाऊन यायचा. आमच्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, देशासाठी जर मुस्लीम आमच्या सोबत येत असतील तर भाजपच्या पोटात का दुखावं? असा सवालही यावेळी उद्ध्व ठाकरे यांनी यावेळी केला.