पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॅन्स यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलांचा आपल्या खास शैलीत पाहुणचार केला. या भेटीदरम्यानचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये मोदी व्हॅन्स यांच्या मुलांसोबत खेळताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. या भेटीतील आणखी एक खास क्षण म्हणजे मोदींनी तिन्ही मुलांना मोरपिसं भेट दिलीत. मोदींच्या या स्वागताने वॅन्स कुटुंब भारावून गेले. पंतप्रधान मोदी महान नेते आहेत, अशा शब्दात जेडी व्हॅन्स यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत पत्नी उषा आणि तीन मुलेही आहेत. सोमवारी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मोदींनी आपल्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार केला. यावेळी मोदींनी वॅन्स कुटुंबीयांना परिसर दाखवला. त्यानंतर इवान आणि विवेकला मांडीवर घेऊन गप्पा मारल्या. नंतर भेटवस्तू म्हणून तिघांनाही मोरपिसे दिली. या खास स्वागताने वॅन्स कुटुंब भारावून गेले. आज ते जयपूरला भेट देतील, तर बुधवारी आग्र्यातील प्रसिद्ध ताजमहल पाहणार आहेत.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांना एक महान नेता म्हटले आहे. आज मी भारताचे पंतप्रधान मोदी यांना भेटलो. भारतासोबत आपल्या देशाचे संबंध अधिक दृढ करण्यास मी उत्सुक आहे. त्यांनी केलेले स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मोदींना भेटणे हा सन्मान होता. ते एक महान नेता आहेत. भारतीय लोकांसोबतची आपली मैत्री आणि सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी उत्सुक आहे, असे व्हॅन्स यांनी म्हटले आहे.
Leave a Reply