इंग्लंडची टीम आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत त्यांच्या पहिल्याच सामन्यात सर्वात मोठ्या उलटफेरची शिकार होता होता राहिली. नेपाळला शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज होती. तेव्हा सॅमने हुशारीने बॉल टाकला आणि अवघी 1 धाव दिली. अशाप्रकारे इंग्लंडने आपली लाज राखली आणि 4 धावांनी विजय मिळवला. तर नेपाळची झुंज अपयशी ठरली. मात्र नेपाळने या कामगिरीसह चाहत्यांची मनं जिंकली.
इंग्लंडने नवख्या असलेल्या नेपाळसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेपाळने या धावांचा पाठलाग करताना सडेतोड बॅटिंग करत शेवटपर्यंत जोरदार लढा दिला. नेपाळच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. नेपाळला मोठा उलटफेर करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. नेपाळने शेवटच्या बॉलपर्यंत लढा दिला. मात्र सॅम करन याने चिवट बॉलिंग केली. सॅमने 9 धावांचा यशस्वी बचाव केला. नेपाळला शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज होती. तेव्हा सॅमने हुशारीने बॉल टाकला आणि अवघी 1 धाव दिली. इंग्लंडने अशाप्रकारे आपली लाज राखली आणि 4 धावांनी विजय मिळवला. तर नेपाळची झुंज अपयशी ठरली. मात्र नेपाळने या कामगिरीसह चाहत्यांची मनं जिंकली.






