kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

तेंडुलकर फॅमिली बस्त्यासाठी थेट काशीला…

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली आणि लेक सारा सध्या काशीच्या दौऱ्यावर असून, याचदरम्यान अंजली यांनी त्यांच्या लेकाच्या लग्नासाठी तसेच भावी सूनबाई, सानियासाठी काही साड्या खरेदी केल्या आहेत.सोमवारी काशीमध्ये पोहोचल्यानंतर, अंजली आणि सारा यांनी ज्येष्ठ पुजारी पंडित श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा श्री काशी विश्वनाथ यांचे दर्शन घेतले आणि पूजा केली. मंदिराच्या अन्नक्षेत्रात, त्यांनी जमिनीवर बसून प्रसाद ग्रहण केला. सीईओ विश्वभूषण मिश्रा आणि एसडीएम शंभूशरण यांच्यासोबत, त्यांनी मंदिर संकुलाचा दौरा केला आणि त्याच्या विस्ताराची कहाणी ऐकली. त्या दोघींनी पीली कोठी येथे असलेल्या अब्दुल मतीन अँड कंपनी या साडी प्रतिष्ठानाला भेट दिली आणि हातमागावरच्या साड्या दाखविण्याची विनंतीही केली.

संस्थेचे संचालक इम्रान मतीन यांच्या सांगण्यानुसार, अंजली व सारा या दोघींनी बनारसी साड्या जवळून पाहिल्या आणि विणकामाचे कौतुक केले. त्यांनी कारागिरीची प्रशंसा केली आणि त्यांना जे जे आवडलं ते खरेदी केलं. दुसऱ्या दिवशी, अंजली आणि सारा गोलघरमधील धनवर्षा साड्यांमध्ये गेल्या. त्या नेहमीच्या ग्राहकांप्रमाणे दुकानात बसल्या आणि भरतकाम केलेल्या, ब्रोकेड आणि टिश्यू बनारसी साड्या पाहत होत्या.

धनवर्षा सिल्कचे श्याम कपूर म्हणाले की, अंजली यांनी मुख्य लग्न समारंभ, मेहंदी समारंभ आणि रिसेप्शनसाठी वेगवेगळ्या थीम्सना अनुकूल असलेल्या प्रीमियम कलेक्शनमधून साड्या निवडल्या. त्यांना पारंपारिक डिझाईन्समध्ये खूप रस होता. अंजली आणि साराच्या दोघींना राजेशाही रंग खूप आवडले. त्यांनी अनेक साड्या ऑर्डर केल्या तसेच गुणवत्ता, कलेक्शन आणि सेवेचे कौतुक केले. एवढंच नव्हे तर शापिंग दरम्यान त्यांनी दुकानात दीना चाटचाही आस्वाद घेतला.