स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांचा आज २३ नोव्हेंबरला विवाहसोहळा पार पडणार होता, पण हा लग्नसोहळा आता स्थगित करण्यात आला आहे. स्मृतीच्या लग्नाच्या दिवशी तिच्या फार्महाऊसमध्ये रूग्णवाहिका आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. स्मृतीच्या वडिलांची सकाळी अचानक तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर स्मृती मानधनाचा लग्नसोहळा स्थगित करण्यात आल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे.
आजचा लग्नसोहळा स्थगित करण्यात आल्याचं स्मृतीच्या कुटुंबीयांनी सांगितलं. वडिलांची प्रकृती स्थिर आहे, मात्र उपचार आणि विश्रांतीची गरज आहे असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आज होणारा सोहळा स्थगित करण्यात आला आहे.
स्मृती मानधनाचे लग्नापूर्वीचे सर्व विधी शुक्रवारपासून सुरू झाले होते. स्मृतीची हळद, मेहंदी, संगीत सोहळा या दिवसांमध्ये पार पडला. या सर्व सोहळ्यांचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सर्वच जणांना स्मृती व पलाशच्या लग्नाचे फोटो पाहण्याची उत्सुकता होती. पण यादरम्यान स्मृतीच्या लग्नसोहळ्यादरम्यान ही बातमी समोर येत आहे.











