मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि सर्वांची लाडकी वहिनी जिनिलिया यांनी काल अयोध्येत जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांची दोन्ही मुलंही सोबत होती. रामनवमीच्या पावन दिनानंतर त्यांनी दर्शनाला हजेरी लावली. प्रभू श्रीरामासमोर दोघंही नतमस्तक झाले. पुजारी संतोष कुमार तिवारी यांनी त्यांना चंदन तिलक लावला आणि आशीर्वाद दिला.
अभिनेते रितेश देशमुख यांनी पत्नी आणि मुलांसह श्रीरामासमोर नतमस्तक होतानाचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्याने लिहिलं, ‘मंत्रो से बढके तेरा नाम…जय श्रीराम! रामललाचं दर्शन झालं हे माझं भाग्यच. ‘ त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रितेश देशमुख शनिवारी लखनऊमध्ये आयपीएल पाहण्यासाठी गेले होते. यानंतर ते कुटुंबासोबत बाय रोड अयोध्येला पोहोचले. प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर देशमुख कुटुंब पुन्हा मुंबईत परतले.