kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेत्री अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती झाली ; मुंबईत २२व्या मजल्यावर खरेदी केले घर

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिने अभिनय, सौंदर्य आणि नृत्याच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीसोबतच तिने बॉलिवूडमध्येही स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आज तिला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. अमृताचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. अशातच अमृताची स्वप्नपूर्ती झाली आहे. तिने मुंबईत आता नवे घर खरेदी केले आहे.

अमृता ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकताच केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत. तिने मुंबईत नवे घर घेतल्याची माहिती सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. प्रेक्षकांना मोहित करणारी अमृता स्वप्न बघून ती सत्यात उतरवण्यासाठी देखील तेवढेच कष्ट करते हे दिसून येते.

मुंबईत स्वतःच अस एक घर घेण्याचं अमृताच स्वप्न पूर्ण झालं असून अमृताने तिच्या नव्या घराची खास झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. तिने या खास घराला एक गोड नाव देखील दिले आहे. अमृताचे हे घर मुंबईतील एका बिल्डींगमधील २२व्या मजल्यावर आहे.
अमृताने व्यक्त केला आनंद

अमृताने घर खरेदी केल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. “स्वप्नांच्या या शहरात घर विकत घेणं हे खरंच एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं वाटतंय. आज माझ्या वाढदिवसाच्या महिन्याच्या सुरुवातीला आणि लक्ष्मी पूजेच्या या शुभवेळेत मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लक्ष्मीचं स्वागत करते. ‘माझ्या गृहलक्ष्मी, माझ्या आईसह. नेहमीच मला एक असं स्वतःचं घर हवं होतं, जे माझ्या मेहनतीनं आणि प्रेमानं तयार झालेलं असावं. माझ्या कुटुंबासाठी, मित्र -मैत्रिणी आणि निर्वाण व नूर्वीसाठी. एक असं घर, जिथं आम्ही सगळे एकत्र येऊ शकतो, अनेक खास क्षण साजरे करू शकतो, आणि जीवनातील सुंदर क्षण अनुभवू शकतो.” असे अमृता म्हणाली.

पुढे अमृताने घराविषयी माहिती देत म्हटले, “मुंबईत घर घेणं हे खूपच स्वप्नवत् वाटतंय. २२व्या मजल्यावर असलेलं हे माझं छोटंसं ३ बीएचके विश्व, मी त्याला ‘एकम’ असं नाव दिलंय आणि नवीन सुरूवात करून आरंभ केला आहे.”

येणाऱ्या काळात अमृता अनेक नवनवीन हिंदी – मराठी प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे.